फेंगशुईनुसार आपल्या आजुबाजुला ऊर्जेचे अनेक स्रोत असतात. सकारात्मक (पॉझिटीव्ह) व नकारात्मक (निगेटीव्ह) असे उर्जेचे दोन प्रकार आहेत. या ऊर्जेचा आपल्या जीवनावर चांगला-वाईट प्रभाव पडत असतो. फेंगशुई नकारात्मक ऊर्जेला निष्क्रिय करून सकारात्मक ऊर्जेत वृध्दी करत असते.
* नात्यामधील जिव्हाळा कायम राहावा म्हणून दक्षिण-पश्चिम दिशा महत्त्वाच्या आहेत. * आपला बिछाना खिडकीला खेटून कधीच लावू नका. त्याने नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. आपण व आपल्या जोडीदारात खटके न उडण्यासाठी बेडरूमच्या खिडकीला पडदे अवश्य लावावेत. खिडकीला पडदे लावल्याने घराबाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही. * नवविवाहित जोडप्याचा बिछाना नवा असायला हवा. (गादी, चादर वगैरे) तसेच त्या पलंगावर दुसर्या कोणाला झोपू देऊ नये. * आपल्या पलंगाखाली कुठलेच सामान ठेवू नका. पलंगाखालील जागा नेहमी खाली ठेवली पाहिजे. त्यामुळेच तर पलंगाच्या चारही बाजूला सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होईल. * प्रवेशद्वार असलेल्या भिंतीला लागून जर आपण पलंग ठेवला असेल तर पती पत्नीच्या संबंधात कटूता निर्माण होते. * बेडसमोर आरसा नसावा. त्यामुळे पती- पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो. आपल्याला निद्रानाशाची व्याधी जडू शकते. जर हे शक्य नसेल तर बेडरूममधील आरशावर रात्री पडदा लावावा. * बेडरूममध्ये टीव्ही, फ्रिज किंवा कॉम्प्यूटर आदी वस्तू ठेवणे हानिकारक आहे. टीव्ही ठेवायचाच झाला तर फाळके असलेल्या शोकेसमध्ये ठेवा. * रंगसंगतीचाही आपल्या नाते संबंधावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. घराच्या भिंतीला फिकट गुलाबी, निळा, पिवळा रंग असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात प्रवाहीत होत असते. फिकट रंग शांतता व प्रेम यांचे प्रतीक होत असतो. * घरातील पडदे, कुशन लाल रंगाच्या शेडमध्ये असावे. कारण लाल रंग रोमांस दर्शवतो. लाल रंगाच्या ऐवजी गुलाबी रंगाचा वापर करू शकता. * प्रेम वाढण्यासाठी बेडरूममध्ये सिरॅमिकची विंड चाइम्स ठेवावे. * बेडरूम सजवावे. ते नेहमी स्वच्छ ठेवावे. * लव्हबर्डस्, मॅंडरेन डक सारखे पक्षी प्रेमाचे प्रतीक असतात. लहान आकारात ते बेडरूममध्ये ठेवावे. * बेडरूममध्ये पाण्याच्या संदर्भातील प्रतिमा लावू नये तर रोमांटीक कलाकृती, लव्ह बर्डसचे पोस्टर लावावे. * नात्यातील जिव्हाळा कायम राखण्यासाठी बेडरूममध्ये शंख व शिंपले ठेवायला विसरू नका.