ग्रह-नक्षत्रे | ग्रहण
मुख्य पृष्ठ ज्‍योतिष » ग्रहमान » ग्रह-नक्षत्रे » आत्मविश्वास डगमगतोय - कुंडली बघा!
ग्रह-नक्षत्रे
Feedback Print Bookmark and Share
 
NDND
समाजात अनेक वृत्ती व प्रवृत्तीच्या लोक असतात. काही नागरिकाना मित्र मैत्रिणीमध्ये रमायला आवडते तर काही जण त्यांच्यापासून दूर पळतात. त्यात त्यांचा काहीच दोष असतो. त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता असल्याने ते गर्दीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतात. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टी विषयी परिपूर्ण ज्ञान असून देखील आत्मविश्वासाच्या अभावामुळे ते इतरावर आपला प्रभाव पाडू शकत नाहीत.

काही जणाना गर्दीची भिती वाटत असते. चारचौघातच काय तर एखाद्या व्यक्तीशीही बोलायला ते घाबरतात. आपल्याकडे ज्ञान असून देखील ते ज्ञान इतराना वाटू शकत नाहीत. त्या मागील एकच कारण म्हणजे त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता.

आपण नोकरीसाठी मुलाखतीला जात असतो. परंतु आत्मविश्वासाची कमतरता असल्यामुळे आपण तेथे विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे व्यवस्थित न देताच बाहेर पडतो व स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतो. वारंवार हे आपल्या सोबतच का घडते, याचे कारण आपण जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आत्मविश्वास कमरता जाणवत असल्यास आपण आपली कुंडली एखाद्या ब्राम्हणाला दाखवून त्यातील ग्रहाचे दोष दूर केले पाहिजे

1. सूर्य :
'सूर्य' हा ग्रह आत्मविश्वासा वाढीसाठी महत्त्वाचा मानला जातो. 1 मूलांक असलेले व्यक्तीमध्ये कधीच आत्मविश्वासाची कमतरता येत नाही. आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या कुंडलीतील सुर्याची स्थिति बघावी. जर सूर्य कारक होऊन शत्रु क्षेत्रात असून त्याच्यावर राहु-केतुचा प्रभाव आहे तर त्याचा प्रभाव वाढवला पाहिजे.

उपाय-
वडीलांची सेवा करावी.
* रविवार उपवास धरावा. विना मीठाच्या (अनोले) जेवनावर उपवास सोडावा.
* दररोज सकाळच्या पहरी सूर्य देवतासमोर उभे राहून 'गायत्री मंत्र' किंवा 'ॐ घृणि सूर्याय नम:' या मंत्राचा 21 वेळा जाप करावा. तसेच 'सूर्य यंत्र' नेहमी आपल्या जवळ ठेवल्याने ही लाभ होत असतो.

2. मंगळ :
'मंगळ' हा ग्रह ऊर्जा व ध्येर्याचा प्रतीक आहे. जर आपल्या कुंडलीत मंगळ कारक होऊन शत्रु क्षेत्रात विराजमान असेल तर तो निर्बल होऊन कमी ऊर्जा प्रदान करत असतो.
उपाय-
* मंगळवारी उपवास धरावा.
* लाल मसूरचे दान करावे
* रक्त दान करावे.
* हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे वाचण करावे.
* माकडाना गुळ-चने खाऊ घालावे.

3. बुध :
'बुध' हा ग्रह बुध्दीचा प्रतीक आहे. आपल्याला बोलण्यासाठी परिपूर्ण करत असतो. कुंडलीत जर तो कारक असेल तर खालील उपाय करावेत.

* गायीला हिरवा चारा खाऊ घालावा.
* हिरवे पालेभाज्या, सलाद, आंबड फळे खावीत.
* गणपतीची आराधणा करावी.
* हिरव्या वस्तूचे दान करावे.

4. गुरु :
'गुरु' हा ग्रह बुध्दी व ज्ञान यांचा स्त्रोत आहे. ज्ञान वाढल्याने आपला आत्मविश्वास वाढत असतो. जर गुरू अशुभ स्थानी असेल तर त्याचा आपल्यावर अशुभ प्रभाव पडत असतो.

* गुरुच्या सहवासात रहावे. त्याचा आदर करावा.
* पिवळ्या रंगाचा रूमाल आपलया सोबत ठेवावा.
* चनादाळ व गुळ गायीला खाऊ घालाव्यात.
* विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट द्या.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: आत्मविश्वास डगमगतोय कुंडली बघा