ग्रह-नक्षत्रे | ग्रहण
मुख्य पृष्ठ ज्‍योतिष » ग्रहमान » ग्रह-नक्षत्रे » कालसर्पदोषापासून मुक्ती मिळवा
ग्रह-नक्षत्रे
Feedback Print Bookmark and Share
 
kalsarp
NDND
शिवशंकर सृष्टीचे संहारकर्ता, ब्रह्मदेव पालनकर्ता व श्री हरिविष्णू कल्याणकर्ता देवता आहेत. यामुळेच सृष्टीचे संचालन होत असते. प्रत्येक रूपात परमेश्वराच्या प्रत्येक रूपात मनुष्य आराधना करत आला आहे. भारतीय लोक शिवाची अनेक रूपात पूजा करत असतो.

श्री भोले शंकर अर्थात रुद्र साक्षात महाकाल आहेत. सृष्‍टीचा अंत यांच्याच हातून लिहिला आहे. सगळे देव, दानव, मानव शिवाची आराधना करतात. मानवाच्या जी‍वनात दु:ख, संकटे येण्याचे मुख्य कारण म्हणजे पाप ग्रह होय. भोळ्या शंकराला सरळ पध्दतीने राजी केले जात असते. शिवाला मोहणारी, प्रसन्न करणारी शक्ति 'गायत्री' (गायत्री मंत्र) असून तिला महाकाली असेही म्हटले जाते.

आपल्या जन्मपत्रिकेत कालसर्प, पितृदोष व राहु-केतु तसेच शनिची साडेसाती असेल तर आपण मानसिकदृष्ट्या नेहमी विचलित होत असतो. मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी भगवान शिवशंकराची गायत्री मंत्राद्वारे आराधना केल्याने लाभ होतो.

कालसर्प, पितृदोष, राहु-केतुचे पाप-पुण्य तसेच शनीची साडेसाती ही सगळी व्यवस्था शंकराच्या आदेशानुसार चालत असते. श्री शंकराची आराधना केल्याने जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतात. शंकराची अनेक प्रकारे आराधना केली जाते. मा‍त्र शिव-गायत्री मंत्राचा पाठ सरळ व अत्यंत प्रभावशाली आहे.

मंत्र-

'ॐ तत्पुरुषाय विदमहे, महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात्।'

वरील मंत्राचा जप कोणत्याही सोमवारपासून प्रारंभ करू शकता. सोमवारपासून मंत्र जप सुरू केल्याने त्वरित लाभ होतात. जप करण्याचीही पद्धत आहे. शिवशंकरासमोर तुपाचा दिवा लावावा. एकाग्रचित्त होऊन मंत्राचा जप करावा. पितृदोष व कालसर्प दोष असलेल्या व्यक्तीने जप प्रति दिन करावा. बाकीच्यांनी रोज या मंत्राचा जाप केल्याने भविष्यात येणार्‍या कष्ट व दु:खाची तीव्रता कमी होत असते. नियमित मं‍त्र जपाने मानसिक शांती, यश, समृध्दी, कीर्ति प्राप्त होते.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: कालसर्पदोषापासून मुक्ती मिळवा