ग्रह-नक्षत्रे | ग्रहण
मुख्य पृष्ठ ज्‍योतिष » ग्रहमान » ग्रह-नक्षत्रे » केतूच्या प्रभावामुळे येते उदासीनता!
ग्रह-नक्षत्रे
Feedback Print Bookmark and Share
 
ग्रह
NDND
आपल्या आजूबाजूला अनेकदा अशी व्यक्ती असते की तिच्या चेहर्‍यावर नेहमी 'बारा' वाजलेले असतात. आनंदाच्या क्षणीही त्याच्या चेहर्‍यावर हसू फुल‍त नाही. तो सदैव निराश दिसतो. अशा व्यक्तींच्या कुंडलीतील लग्नात केतूचा सर्वांधिक प्रभाव असतो.

केतू मुख्यत: उदासीनता निर्माण करणारा ग्रह आहे. केतूच्या प्रभावामुळे चेतनाक्षमता हरवतो. आशा, आकांक्षा लोप पाऊन आत्मविश्वास डगमगतो. चेहर्‍यावरील हास्य हरवून जाते. अशा व्यक्तींचा जीवनाकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोण नकारात्मक होऊन जातो.

वास्तविक केतु हा ग्रह संन्यास, त्याग, उपासना यांचा कारक आहे: केतूचा प्रभाव असणारी व्यक्ती लवकर विरक्ती पत्करत असते. व्यय स्थानातील केतू मोक्षदायक मानला जातो. कुंडलीत केतू सूर्यासोबत आला असेल तर मन प्रफुल्लित असते. मंगळासोबत आला तर काम टाळण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते. शुक्रयुक्त असेल तर विवाहासंदर्भात उदासीनता, गुरुसोबत असेल तर वैराग्य संभवते. बुधसोबत वाणी दोष व चंद्रसोबत असेल तर निराशा, अशा प्रकारे केतू आपल्यावर प्रभाव टाकत असतो.

NDND
केतूने ग्रासलेली व्यक्ती नेहमी विरक्ती पत्करण्याच्या गोष्टी करते. नेहमी तो आजारी पडत असतो. त्याच्यातील आत्मविश्वास कमी होऊन त्याची जागा उदासिनता घे‍त असते.

केतूचा प्रभाव असलेल्या व्यक्तींमध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाने बदल घडत असतो. केतूचा प्रभाव कमी करण्‍यासाठी गणपतीची आराधना करावी.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: केतूच्या प्रभावामुळे येते उदासीनता