वास्तुलेख | वास्तुसल्ला
मुख्य पृष्ठ ज्‍योतिष » वास्तुशास्त्र » वास्तुसल्ला » मुलांची खोली कशी असावी?
वास्तुसल्ला
Feedback Print Bookmark and Share
 
ND
ND
मुलांची खोली घराच्या पश्चिम, उत्तर अथवा पूर्व दिशेला असावी. मुलांच्या खोलीतील सजावटीमुळे संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा संचार करत असते. जर घरात मुले नसतील तर त्या घराला घरपण येत नाही. मुलांना देवा घरची फुले म्हटले जात असते. मुलांच्या हसण्‍या खिदळण्याने घरातील वातावरण उत्साहवर्धक होत असते. त्यामुळे मुलांची खोली कशी असावी या विषयी वास्तूशास्त्रात महत्त्वपूर्ण अशी माहिती सांग‍ितली आहे.

मुलांच्या खोलीचे प्रवेशद्वार उत्तर अथवा पूर्व दिशेला पाहिजे. तसेच खोलीच्या खिडक्या ह्या पूर्व दिशेला असाव्यात. त्यांच्या अभ्यासाचा टेबल हा पूर्व अथवा उत्तर दिशेला असावा. पुस्तके ईशान्य कोपर्‍यात ठेवावीत. अभ्यास करताना मुलांचा चेहरा उत्तर अथवा पूर्व दिशेला असावा, अशी त्यांची अभ्यासाची व्यवस्था केली पाहिजे. एक छोटेशे मंदीर मुलांच्या खोलीत असावे. त्या मंदीरात विद्देची अधिष्ठात्री देवी सरस्वतीची मूर्ति अथवा प्रतिमा असावी.

मुलांच्या खोलीत अभ्यास साहित्याशिवाय इतर सामानाची गर्दी करू नये. मुलाचा बिछाना हा नैऋत्य कोपर्‍यात असावा. झोपतांना त्यांचे डोके दक्षिण दिशेला पाहिजे. परंतु मुलांनी स्वत:चे डोके पूर्व दिशेलाही ठेवू शकतात.

मुलांच्या खोलीतील भिंतींना भडक रंग देऊन नये. हलक्या रंगाच्या शेड्‍स द्याव्या‍त. त्यामुळे मुलांचा स्वभाव शांत राहून त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. खोलीतील मध्यभाग हा मुलांना खेळण्यासाठी मोकळा सोडावा. मुलांच्या खोलीचा दरवाजा ज‍िन्याला खेटून अथवा शौचालयास खेटून नसावा. मुलांची खोली नेहमी स्वच्छ असावी.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: मुलांची खोली, वास्तुशास्त्र, फेंगशुई, ज्योतिषशास्त्र