सलमान खान कतरीना कैफच्या बाबतीत भलताच 'पझेसिव्ह' आहे. कतरीना फक्त आपलीच आहे, इतर कोणाचीही नाही, हा फिल्मी डायलॉग त्याने प्रत्यक्षातही आणल्याचे दिसतेय. न्यूयॉर्क या चित्रपटात कतरीना आणि जॉन अब्राहमचे हॉट बेडरूम शॉट्स आहेत. म्हणून सल्लूमियांनी हा चित्रपट न पहाण्याचे ठरवलेय. कतरीना चित्रपटात का होईना इतर कुणाबरोबर शारीरिक जवळीक साधतेय हे सल्लूमियांना सहन होण्यासारखे नाही. म्हणूनच तो तिच्या कुठल्याही प्रीमीयरना जाण्याचे टाळतो.