चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » सैफ-करीनासाठी जुलै महत्त्वाचा
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
IFMIFM
करीना कपूर आणि सैफ अली खानसाठी जुलै महत्त्वाचा आहे. करीना कपूरचा कम्बख्त इश्क येत्या तीन जुलैला प्रदर्शित होतोय. त्याचवेळी सैफ अली खानच्या होम प्रॉडक्शनचा 'लव्ह आज कल' ३१ जुलैला पडद्यावर झळकतोय.

कम्बख्त इश्कमध्ये करीना अक्षयकुमारसोबत आहे. या जोडीचा टशन फ्लॉप झाला होता. पण कम्बख्त इश्क हिट होईल अशी करीनाला आशा आहे. त्याचवेळी सैफच्या लव्ह आजकल विषयीसुद्धा करीनाला आशा आहेत.

सैफ आणि करीना लग्न केव्हा करणार हे त्या भगवंतालाच ठावूक. पण सैफ चांगला पती असेल हे मात्र करीनाला पक्के वाटतेय. त्याच्यासोबत घालविलेले क्षणच तसे संकेत देतात, असे करीनाचे म्हणणे आहे. अमृतासिंहसाठी सैफ भलेही आदर्श पती नसेल, पण करीनाला मात्र त्याच्याविषयी खात्री आहे.

करीना थ्री इडियट्स या चित्रपटातही झळकते आहे. आमीर खानसोबत तिचा हा चित्रपट आहे. 'लगे रहो मुन्नाभाई' बनविणार्‍या राजकुमार हिराणीसोबतचा हा चित्रपट करीयरमधील महत्त्वाचा टप्पा असल्याचे ती मानते.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: करीना कपूर, सैफ अली खान, थ्री इडियट्स, कमबख्त इश्क, आमिर खान, लव आज कल, बॉलीवुड