प्रीती झिंटा सध्या टेन्शनमध्ये आहे. उद्योगपती नेस वाडियाशी तिचचे दीर्घकाळ संबंध होते. पण आयपीएल सुरू असतानाच ते तुटले. आता प्रीती गेल्यानंतर नेसने दुसरी 'प्रीती' शोधली आहे. आयेशा थापर नावाच्या एक मैत्रिणीशी नेस यांनी सूर जुळवले आहेत. आयेशा दिल्लीतील मॉडेल असून अनेक पार्ट्यांमध्ये ती नेसबरोबर दिसते आहे. नेसच्या मिठीतली आयेशा लक्षवेधी ठरली आहे. आता एकाकी पडलेली प्रीती काय करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.