अध्ययन सुमनशी असलेले अफेअर तुटल्यानंतर एकाकी पडलेल्या कंगना राणावतचे सूर आता दिग्दर्शक कुणाल देशमुखशी जुळले आहेत. गेल्या काही दिवसांत या दोघांना एकत्र पाहिले गेले आहे. कंगनाने कुणालला गिफ्ट दिल्याचीही चर्चा आहे. कुणाल आणि कंगना एकमेकांना बर्याच आधीपासून ओळखत आहेत. दोघेही भट्ट कॅम्पशी निगडीत आहेत. परस्परांच्या संबंधांबाबत बोलण्यास मात्र दोघेही उत्सुक नाहीत. आपल्या दोघांत शुद्ध मैत्री असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.