रितेशची इच्छापूर्ती

बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर रितेश देशमुखच्या आयुष्यात दोन इच्छा होत्या. एक म्हणजे अलाद्दिनची भूमिका करणे आणि अमिताभ बच्चनसमवेत काम करणे. या दोन्ही इच्छा अल्लादिन या चित्रपटामुळे पूर्ण झाल्या आहेत. एकाच चित्रपटाच्या माध्यमातून या दोन इच्छा पूर्ण होतील, असे कधी वाटलेही नव्हते, असे रितेश म्हणाला. अल्लादिनची भूमिका आणि आपल्यात फार फरक नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. मी शाळेत असताना गप्प असायचो. फार बोलत नव्हतो. माझे मित्रही कमी होते. स्वतःमध्येच बुडालेला असायचो. अल्लादिनही माझ्यासारखाच आहे, असे रितेश म्हणाला.