चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » कुठे गेले शेर्लिन चोप्राचे चाहते?
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
IFM
IFM
अखेर शेर्लिन चोप्राला बिग बॉसचे घर सोडावे लागले. गेल्या अनेक आठवड्यांपासून नशीबाने तिला हात दिला होता. पण नशीबावर किती दिवस चालणार? या शोधमधून बाहेर पडण्यासाठी तिची स्पर्धा विंदू दारा सिंह बरोबर होती. पण विंदूने तिलाच घराबाहेर काढले. या शोमध्ये जास्तीत जास्त काळ राहून नाव कमाविण्याची शेर्लिनची संधी हुकली आहे. तिला लोकांनीही मते दिली नाहीत आणि तिच्याच सहकार्‍यांनीही तारले नाही.

शेर्लिन वास्तविक तिच्या हॉट इमेजमुळे चांगलीच लोकप्रिय असावी असा अंदाज होता. पण मतातून तो दिसला नाही. तिच्या तुलनेत विंदू दारा सिंहला फारसे कुणी ओळखतही नाही. पहिलवान आणि अभिनेते दारासिंहचा विंदू हा मुलगा. पण अभिनयातही त्याचे नाणे चालले नाही आणि पैलवानकी त्याला झेपली नाही. आता नाव कमाविण्यासाठी तो बिग बॉसमध्ये आला आहे. आणि इथे त्याने शेर्लिनलाच धोबीपछाड दिली आहे. या निमित्ताने शेर्लिनला तिची लोकप्रियता किती हेही कळले असेल.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: शेर्लिन चोप्रा विंदू दारा सिंह