रियाचा नवा 'हॉट लूक'

बंगाली बाला रिया सेन बर्यात दिवसांनंतर मुंबईत दिसली. गेल्या अनेक दिवसांपासून ती मुंबईबाहेर होती. सुटी साजरी करून ती आता मुंबईत परतली आहे. सुभाष घई यांनी दिलेल्या पार्टीत ती दिसली. पूर्वीपेक्षा ती जास्त सेक्सी दिसते आहे. सुटीनंतर खरं तर फिल्म स्टार्स अंमळ फुगूनच येतात. पण रियाचे वजन घटले आहे. त्यामुळे तिचे सौंदर्य वाढले आहे. तिला पाहून बॉलीवूडची अनेक मंडळी चकीत झाली. अब्बास मस्तान, डेव्हिड धवन यांनी तिला तर शुभेच्छा दिल्या. तिच्या या नव्या लुकमुळे तिला चित्रपटांत काम मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.