कतरीनाकडून भेदभाव?

कतरीना कैफचे अजब प्रेम की गजब कहानी व दे दना दन हे दोन बडे चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होत आहेत. कतरीनाही दे दना दन पेक्षा 'अजब प्रेम'च्या प्रमोशनमध्ये जास्त उत्सुकता दाखवत आहे. तिच्या दृष्टीकोनातून हा चित्रपट महत्त्वाचा आहे. दे दना दन मध्ये समीरा रेड्डी आणि नेहा धुपियासुद्धा आहेत. मल्टिस्टारर चित्रपट असल्याने कतरीनाला यात फारसा वाव मिळालेला नाही. या उलट अजब प्रेममध्ये कतरीना सोलो हिरॉईन आहे. रणबीर तिचा हिरो आहे. त्यामुळेच अजब प्रेमविषयी ती जास्त अपेक्षा बाळगून आहे. पण खुद्द कतरीना मात्र हे नाकारते. दोन्ही आपलेच चित्रपट आहेत. त्यामुळे त्यात भेदभाव करण्याचे काही कारण नाही, असे तिचे म्हणणे आहे. दे दना दनमध्ये तिचा आवडता नायक अक्षयकुमार आहे. त्यामुळे आपण असे करणारच नाही, असा तिचा बिनतोड युक्तीवाद आहे.