अमृताचं हॉट फोटोसेशन

गुरूवार, 5 नोव्हेंबर 2009( 15:58 IST )
अमृता रावकडे पाहिल्यानंतर ती किती सोवळी आहे असे वाटते. तिच्या आतापर्यंतच्या भूमिकाही तशाच आहेत. विवाह या तिच्या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनीही एकदा सांगितले होते, की वधू म्हणून जे गुण पाहिजेत ते सगळे अमृतामध्ये दिसतात. म्हणूनच की काय सध्या अमृता परफेक्ट इंडियन ब्राईड या शोमध्ये जज आहे.
पण आता या 'सीधी-साधी लडकी' भूमिकेचा अमृतालाच कंटाळा आलाय. आपणही 'हॉट' आहोत, हे दाखविण्याची खुमखुमी तिला अनावर झाली आहे. शॉर्टकट या चित्रपटातून तिने ते दाखवूनही दिले. नुकतेच तिने द मॅन या मॅगझिनच्या वेडिंग स्पेशल इश्यूसाठी फोटोसेशन केले. हे फोटोसेशन अतिशय हॉट होते. यात तिची मुलाखतही छापण्यात आली असून आपले विचार किती खुले आहेत हेच तिने यात दाखवून दिले आहे.
लग्नापूर्वी सेक्स करण्यात काहीही वाईट नाही, असे तिचे म्हणणे आहे. प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात छान प्रेमसंबंध असतील, तर मग सेक्स करण्यात गैर काय असा तिचा सवाल आहे. फक्त काळजी घेतली की झालं अशी तिची भावना आहे.