सौंदर्य सल्ला | मुक्ता विशेष | जागतिक महिला दिन | घरकुल
मुख्य पृष्ठ » विविध » मुक्ता » मुक्ता विशेष » इंद्रधनुषी रंग बीड्सचे
 

bids
ND
बीड्स, विभीन्न प्रकारचे स्टोन जे सध्या फॅशन विश्वात आपला प्रभाव दाखवत आहे. यांचे सप्तरंगी रूप आणि वेगवेगळ्या आकार आपली उपस्थिती दर्शवते आहे. प्रत्येकाची पसंत बनलेली हे बीड्स मग ते ब्रेसलेट, ईयररिंग असो वा नेकलेस या सर्वांमधे फीट बसतात. चिपचीप करणार्‍या या उन्हाळ्यात कोटेडे आर्टिफिशिअल ज्वेलरीचे चलन मागे पडत आहे. अशावेळी नवी फॅशन काय, तर जी सुंदर असेलच शिवाय आरामदायकही, स्वस्त इतकी फॅशनच्या बदलत्या ट्रेंडनुसार बदलताना महागात पडू नये, सहज उपलब्धही होईल.

रंगगिरंगी असणारे हे बीड्स प्रत्येक ड्रेसवर मॅचही होतील. बीड्स वरील सर्व अटीची पूर्तता करतात. म्हणूनच तर 'ये है राईट चॉईस'. बीड्सची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ईयरिंग बनविताना यांना मनपसंत आकारात घालू शकता. कलर मॅचिंग किंवा काँट्रास्टसोबत यांच्या आकारातही व्हेरायटी बघायला मिळते.

ब्रेसलेटमध्येही विविध रंग आरामात निवडता येईल. नाजूक मनगटावर कितीही मोठ्या आकाराच्या बीड्स आणि त्यांचे सर गुंडाळाल हे तुम्हीच ठरवू शकता. तुमचा ड्रेस खास बनविण्यासाठी गोल्डन आणि सिल्व्हर बीड्सचा वापर करू शकता. ड्रेसवर प्लास्टिक बीड्सचा वापर मात्र कमीतकमी करा. गळ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी बारीक बीड्सची मदत घेऊ शकता. ज्या रंगबिरंगी असतील तर क्या कहने? तीनचार रंगाचे सर रंगाच्या उतारचढावाने सजलेला गळा प्रत्येकाचे मन मोहीत करते.

बीड्सचा आकार वेगवेगळ्या प्रसंगानुसार आपले खास स्थान निर्माण करतो. गळ्यावर फीट असलेली बारीक बीड्सची माळ तुम्हाला खास बनविते. आता तर चौकोण आणि आयाताकार बीड्सही बाजारात उपलब्ध आहेत. हे इंडियन ड्रेसेसवर वेस्टर्न ड्रेसेसप्रमाणे तितकेच शोभतात. फक्त समझदारी दाखवायची आहे ती रंगाच्या निवडीबाबत. वेस्टर्नवर ब्लॅक, व्हाईट आणि पेस्टल तर भारतीय परिधानांवर ब्राईट आणि बोल्ड एथनिक कलर्स.

हटके दिसायची इच्छा असेल तर असेल तर संपूर्ण इंद्रधनुषी रंग तुमच्यासाठीच आहेत.

सभार : देशोन्नती
• Play Free Online Games Click Here
• Blogs, Videos and More Click Here
• Send Musical and Animated Cards Click Here
• Simple,Fast & Free Email Service Click Here
संबंधित माहिती शोधा