लिंबाचा रस काढण्यापूर्वी ते काही वेळ गरम पाण्यात बुडवून ठेवा. अधिक चांगल पिळलं जाईल.केळी पिकून फुकट जाणार असतील, तर ती सालासकट फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे जास्त पिकणार नाहीत.बटाट्यांमध्ये एखादं सफरचंद ठेवून दिल्यास बटाट्यांना लवकर कोंब येत नाहीत.पदार्थामध्ये लोणी वापरताना ते लवकर वितळायला हवं असेल तर गरम केलेला बाऊल किंवा भांडं त्यावर उपडं ठेवा.अंडी वापरायच्या 15-20 मिनिटं आधी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवावे.मसाला करताना मिरचीचे देठ काढून त्याला तेलाचा हात फिरवून उन्हात एक दिवस वाळवावी. मग दळावी. रंग चांगला येतो.मशरूम स्वच्छ करताना पाण्याने धुणं टाळा. कारण त्यांची चव कमी होते. त्याऐवजी एखाद्या ब्रशने ते स्वच्छ करून घ्या. |