पाणीपुरीच्या पुर्या घरी करताना बारीक रव्यात थोडा सोडावॉटर टाकून पीठ मळावे. कणकेत जास्त तेल झाल्यास पोळी नीट फुगत नाही. कोणत्याही पिठाचे धिरडे करताना त्यात कच्चे तेल टाकावे. त्यामुळे धिरडे सछिद्र होतात. आयत्यावेळी दोन मुठी रवा घातल्यास धिरडी कुरकुरीत होतात.