मीठदाणीत मीठ नेहमी चिटकत असते. झाकण लावण्याआधी त्यात तीन-चार दाणे तांदुळाचे टाकावे म्हणजे चिटकत नाही. लोणी निघाल्यावर ते भांड्यात घालून, पाण्यात थोडे मीठ घालून, ते पाणी लोण्यावर घालावे व रोज पाणी बदलावे, म्हणजे लोण्याला वास न येता लोणी बरेच दिवस टिकते. करवंदाला चीक असतो, तो जाण्याकरिता पाण्यात थोडे मीठ घालून त्यात करवंदे बुडवून ठेवावीत. चीक सुटून करवंदे स्वच्छ होतात.