नॉर्मल स्कीनसाठी (सामान्य त्वचा) :नॉर्मल स्कीनमध्ये ताजगी व लवचिकपणा असतो. अशी त्वचा जास्त तेलकट किंवा जास्त कोरडी नसते. या त्वचेची व्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने चेहरा स्वच्छ धुवावा नंतर क्लींजिक मिल्कने स्वच्छ करावा. त्यानंतर चांगल्या क्रीमने मसाज करायला हवा. सर्वांत शेवटी चेहर्याला कापसाने स्वच्छ पुसून काढावे. हे फेशियल रात्री करायला पाहिजे. याने चेहरा स्वच्छ व आकर्षक दिसेल. ड्राय स्कीन (कोरड्या त्वचेसाठी) : ड्राय स्कीन दिसायला नीरस व कोरडी दिसते. ड्राय स्किनवर नैसर्गिक प्रभाव लवकर पडतो. त्वचेची योग्य देखरेख नाही केली तर लवकरच सुरकुत्या पडायला लागतात. अशा प्रकारच्या त्वचेवर साबण कमी कमी वापरला पाहिजे. ज्या महिलांची त्वचा कोरडी असेल त्यांनी ए, बी, सी आणि डी जीवनसत्त्वाचा उपयोग केला पाहिजे. चेहरा नेहमी ग्लिसरीनयुक्त साबणाने धुतला पाहिजे. तेलकट त्वचा (ऑयली स्कीन) : या प्रकारच्या त्वचेवर नेहमी डाग, पिंपल्स राहतात. ऑयली स्कीन दिवसातून 2-3 वेळा स्वच्छ धुतली पाहिजे. रात्री दूध किंवा क्लिंजिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करायला हवा. दर 15 दिवसांत वाफारा घेतला पाहिजे. वाफ घेतल्यानंतर थंड पाण्याने चेहर्यावर धुवावा. चेहर्याला एस्ट्रीजेंट लावून स्वच्छ करावे. टेल्कम व कॉर्नफ्लावर सम प्रमाणात घेऊन त्यात थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून चेहर्यावर व मानेवर लावावी. नंतर एस्ट्रीजेंटने स्वच्छ करावे. चेहर्यावर पिंपल्स किंवा डाग असल्यास फेशियल करणे टाळायला पाहिजे. एखादा पिंपल असेल तर तेवढी जागा सोडून बाकी जागेवर फेशियल करू शकता. हे करताना नाक, डोळे, गाल, ओठ, मान व कपाळ इत्यादींचा मसाज केला जातो, म्हणून फेशियल नेहमी योग्य पालर्रमध्ये जाऊनच केले पाहिजे. |