अशा प्रकारचे पॅक त्वचेवर लावल्यानंतरही नरमच राहतात. हे पॅक सुकून कडक होत नाहीत व आक्रसलेही जात नाहीत. त्यामुळे हे पॅक त्वचेचे टोनिंग करण्यास असमर्थ असतात. आवश्यकतेनुसार असे मास्क सगळ्यात प्रकारच्या त्वचांसाठी वापरले जातात. नॉन सेटींग पॅकही विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असतात. क्रीम मास्क - क्रीम मास्कद्वारे त्वचेचे पोषण केले जाते आणि त्वचेला मुबलक प्रमाणात मॉईश्चरही प्रदान केले जाते. अनेकदा फेशियल मसाजनंतर अशा पॅकचा उपयोग केला जातो. अशा पॅकचा वापरामुळे त्वचा मऊ आणि टवटवीत होते. मुख्यत्वे मॅच्युअर (वयस्क) त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. नियमित वापरासाठीही असे पॅक उपयुक्त ठरतात. कोमट तेलाचे मास्क - साधारणपणे बदामाचे तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा जर्दाळूच्या बी चे तेल अशा पॅकसाठी उपयुक्त ठरते. असा पॅक वापरण्यासाठी वॅक्स हीटरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये गॉज किंवा तत्सम कापड भिजवले जाते आणि हे तेलाने भिजलेले कोमट गॉज चेहर्यावर 10-15 मिनिटांसाठी ठेवले जातात. कोरड्या त्वचेसाठी असे पॅक वापरले जातात. अशा पॅकमुळे त्वचेमधील मॉईश्चर सुरक्षित ठेवले जाते आणि त्वचा अधिकाधिक स्निग्ध आणि मुलायम बनत जाते. नॅचरल मास्क - असे पॅक नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केली जातात. साधारणपणे मिनरल्स आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असलेली द्रव्ये यासाठी वापरली जातात. हर्बल मास्क हे वाळा, नागरमेथा, कापूर कचरी, नीम पत्र, संत्रासाल, ज्येष्ठमध, गंजिष्ठा, बावची इत्यादी द्रव्ये वापरुन तयार करतात. या नैसर्गिक वनौषधींमधले त्वचेचे आरोग्य आणि सौंदर्य खुलवणारे, रंग खुलवणारे, त्वचेची खाज कमी करणारे इत्यादी गुणधर्म त्वचेसाठी अतिशय गुणकारी ठरतात. नॅचरला मास्क तयार करण्यासाठी विविध प्रकारची फळे आणि भाज्यांचाही उपयोग केला जातो. केळ, पपई, संत्रे, अननस, द्राक्ष, सफरचंद, डाळींब इत्यादी फळे तर काकडी, टोमॅटो, बटाटा, पानकोबी, लाल भोपळा इत्यादी भाज्यांचा उपयोग नॅचरल मास्कमध्ये केला जातो. या व्यतिरिक्त मध, अंड्यातील पांढरा बलक इत्यादी द्रव्यांचाही नॅचरल मास्कमध्ये उपयोग केला जातो. |