मुख्य पृष्ठ > विविध > करीयर > वाटा करीयरच्या > समाजकार्यात करियरची संधी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
समाजकार्यात करियरची संधी
समाजातील शोषितांसाठी झटणार्‍या व तळागाळातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही सामाजिक संस्था आज मोठ्या प्रमाणात कार्य करताना दिसून येतात. 12 वी उत्तीर्ण केल्यानंतर साचेबध्द शिक्षणाची चोकोरी ओलांडून समाजसेवा हा अभ्यास विषय निवडून त्यात करियर करण्याची संधी आजच्या होतकरू तरूण- तरूणींसाठी उपलब्ध आहे. परंतु त्यासाठी समाजकार्यात आवड निर्माण होणे महत्त्वाचे आहे.

समाज अन्याय, व्यसनाधिनता, गरीबी अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात सापडलाय. या समस्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी समाज सेवकाची गरज ही भासत असते. आज समाजात सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून समाज सेवक कार्यरत झाले आहेत. समाजातील पीडित घटकाला मार्गदर्शनाअभावी समस्यांमधून बाहेर निघण्यासाठी मार्ग दिसत नाही. अशा घटकाला मदत, मार्गदर्शन तसेच समस्येवर मात करण्यासाठी त्याला आत्मिक बळ समाज सेवक देत असतात. परिस्थितीवर विजय मिळविण्याठी तळागाळातील लोकांमध्ये आशेचा किरण दाखविण्‍याचे कार्य समाजसेवकच करत असतो.

12वीनंतर एक वर्षाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रम अथवा तीन वर्षांच्या बी.एस.डब्ल्यू या पदवीला प्रवेश मिळवता येतो. पदवी उत्तीर्ण केल्यानंतर दोन वर्षांचे पदव्यूत्तर (एम.एस.डब्ल्यू) शिक्षण कुटूंब व बालकल्याण, समाजकल्याण, नागरी आणि ग्रामीण विकास, वैद्यकिय व मानसशास्त्र, गुन्हेजगत व मजूरकल्याण आदी विषयात आवडीनुसार आपल्या करिअरला आकार देऊ शकता.
  समाजातील पीडित घटकाला मार्गदर्शनाअभावी समस्यांमधून बाहेर निघण्यासाठी मार्ग दिसत नाही. अशा घटकाला मदत, मार्गदर्शन तसेच समस्येवर मात करण्यासाठी त्याला आत्मिक बळ समाज सेवक देत असतात.      


समाजकार्य अभ्यासक्रमात क्षेत्रीय कार्य व अनुभवावर भर दिलेला असतो. समाजातील प्रत्येक वयोगटातील पीडितांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचा विविध पैलूने विद्यार्थी त्या सोडवताना दिसतात. पदव्युतर परीक्षेत विद्यार्थ्यांना एखाद्या सामाजिक विषयावर सखोल अभ्यास करून प्रबंध सादर करावा लागतो.

खाजगी सामाजिक संस्था, खाजगी कंपनी, समाजकल्याण विभाग, ग्रामीण व सरकारी रूग्णालय जनसंपर्क अधिकारी, प्रचारक, समन्वयकांची नेहमी आवश्यकता भासत असते. चांगले मानधन व पगार पॅकेज मिळवता येते.

समाजकार्य अभ्यासक्रम उपलब्ध असणार्‍या महाराष्ट्रातील काही संस्था-
* मुंबई विद्यापीठ- समाजकार्य विभाग, कलिना, सांताक्रुझ (पू) मुंबई.
* टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई- 400 088.
* इंदीरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, पुणे- 411 042.
* पुणे विद्यापीठ, पुणे-411 007.
* भारती विद्यापीठ, पुणे-
* डॉ. आंबेडकर मराडवाडा विद्यापीठ औरंगाबाद- 431 004.
* नागपूर विद्यापीठ, नागपूर- 440 051.
* उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ- जळगाव.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
पर्यटनमध्ये उज्ज्वल करियर बनवा!
वास्तुशास्त्रात करियर बनवा!
परदेशी भाषांमध्‍ये करीअरच्‍या उज्ज्वल संधी
ग्राफिक डिझायनिंग- उत्तम करियर
नृत्य प्रशिक्षण व संधी
नृत्यात करीयरसाठी पूर्वअट