मुख्य पृष्ठ > विविध > करीयर > वाटा करीयरच्या > मॉडेलिंग- ग्लॅमरस करियर
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मॉडेलिंग- ग्लॅमरस करियर
Sushmita sen
IFMIFM
तरुणाईला वेडं करणारं करियर म्हणजे 'मॉडेलिंग'. एक काळ होता की या क्षेत्रावर 'महिला राज' होते. पण अलिकडच्या काळात पुरूषही कौशल्याने रॅम्पवर चालताना दिसतात. ग्लॅमर व भरपूर पैसा असल्याल्या मॉडेलिंगकडे तरूण पिढी मोठया प्रमाणात वळली आहे.

सुष्मिता सेन, ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रा, लारा दत्ता या सिनेतारकांना घडविण्यात मॉडेलिंग क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हणायला हरकत नाही. पूर्वी मॉडेलिंगमध्ये तरूणींचे शोषण केले जात होते, असे म्हटले जात होते. मात्र, आता टीव्हीवरील एका छोट्याशा जाहिरातीमध्ये झळकणार्‍या तरूणीलाही मोठी प्रतिष्ठा मिळू लागल्याने मागील सगळे दुराग्रह पुसले गेले आहेत. ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी उत्पादन तसेच जाहिरात कंपन्या नव्या चेहर्‍यांच्या शोधात असतात.

'मॉडेलिंग' हे क्षेत्र परिश्रमाची पराकाष्टा करायला लावणारे आहे. एकदा या क्षेत्रात नाव झाले म्हणजे लक्ष्मी पाणी भरते. हे प्रसिद्धीसोबत मुबलक पैसा कमावून देणारं क्षेत्र आहे. मात्र, हे यश टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आजची फॅशन उद्या शिळी होते, हे लक्षात घेऊन नव्या युगाच्या प्रवाहात नेहमी राहावे लागत असते. मॉडेलिंग करण्यासाठी वयाची आणि शिक्षणाचीही अट नसते. लहान मुलांचीही मॉडेलिंगसाठी निवड केली जाते. एखादी जाहिरात कंपनी अशा मुलांच्या पालकांशी करार करत असतात.

या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी पाहिजे असतो स्वत:चा 'स्ट्रॉंग पोर्टफोलिओ'. एखाद्या नामवंत फोटोग्राफरकडून अलिकडच्या काळात काढलेल्या विविध एंगलमधील छायाचित्राचा अल्बम हाच स्वत:चा बायोडेटा समजला जातो. याशिवाय विविध टीव्ही चॅनल्स व सौंदर्य प्रसाधन कंपन्यांनी आयोजित केलेल्या कॉन्टेस्टमध्ये सहभाग, या मार्गाने आपल्याला मॉडेलिंगमध्ये पाऊल ठेवता येते.

मॉडेलिंगच्या शिक्षणाच्या जोडीने आपल्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देऊन मॉडेलिंग क्षेत्रात अल्पावधीत नाव कमावता येते. भारतात तसेच भारताबाहेर मॉडेलिंगचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था आहेत. 'अर्न अ‍ॅण्ड लर्न' या पध्दतीने मॉडेलिंगचा अभ्यास केला जातो. शाररिक स्वास्थ्य, आत्मविश्वास वाढविणे, भीती नाहीशी करणे, आपले राहणीमान, मेकअप, संभाषण कौशल्य आदी गोष्टी मॉडेलिंग तंत्रासोबत शिकविल्या जात असतात. एका यशस्वी मॉडेलला कंपनीची 'ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसडेर' म्हणून ऑफर मिळते. लाखो रूपयात कंपनीशी करार केले जातात.
lara datta
IFMIFM

छोट्या जाहिराती करता ५० हजार रूपयांपर्यंत मानधन जाहिरात कंपनीकडून कमावता येते. मोठ्या शहरात होर्डिंग लावले जातात. मॉडेल्सचे फोटो झळकतात. प्रसिध्दीसोबत पैसा कमावता येतो. मॉडेलिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे, ती त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. हे क्षेत्र फॅशन व चित्रपटसृष्टीशी संलग्न असल्याने यात तरूण तरूणींची फरवणूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

'मॉडेल' होण्यासाठी पात्रता-
मॉडेल होण्यासाठी सौंदर्यासह सकारात्मक दृष्टिकोण आवश्यक असतो. 'मॉडलिंग' म्हणजे प्रयत्नांची पराकाष्टा करणे होय. या क्षेत्रात करियर करणार्‍यांनी अधिक परिश्रम घेण्याची तयारी दाखविली पाहिजे. सुपरफास्ट वेगाने धावणार्‍या जगासोबत धावण्यासाठी स्वत:चा वेग वाढवणे अत्याधिक गरजेचे झाले आहे. 'आजची फॅशन उद्या शिळी होत असते' हे सुत्र नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे नव्या युगाच्या प्रवाहात कोणते बदल झाले, हे क्षणात ओळखण्‍याचे कौशल्य आपल्या अंगी असायला पाहिजे. सळपातळ बांधा, आकर्षक व्यक्तीमत्व, संभाषण चातुर्य हे यशस्वी मॉडेल्सच्या अंगी असलेले गुण आहेत.

इंटरनेटचे जाळे खूप पसरले आहे. www.modeling.com, www.Ramp.com या संकेत स्थळावर मॉडेलिंग विषयी माहिती उपलब्ध करून दिली आहे.

मॉडेलिंगचे प्रशिक्षण देणार्‍या मुंबईतील संस्था
* ओझोन मॉडेल्स मॅनेजमेंट, गावदेवी, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई.
* वाय.एस.जी वर्ल्डवाइड प्रमोशन एजन्सी, ओरिएन्ट हाऊस, मुंबई.
* मैसूर मॅनेजमेंट सर्व्हिसेस, ३०२, राधा मुकुंद, बी.पी.रोड, दहिसर (पश्चिम) मुंबई.
* फेस वन, ७९७, जेसिया बिल्डिंग, जमशेदजी रोड, पारसी कॉलनी, दादर, मुंबई.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
समाजकार्यात करियरची संधी
पर्यटनमध्ये उज्ज्वल करियर बनवा!
वास्तुशास्त्रात करियर बनवा!
परदेशी भाषांमध्‍ये करीअरच्‍या उज्ज्वल संधी
ग्राफिक डिझायनिंग- उत्तम करियर
नृत्य प्रशिक्षण व संधी