मुख्य पृष्ठ > विविध > आरोग्य > अडगुलं मडगुलं > मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या!
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या!

मुलांचे वजन
जन्मत: मुलांचे वजन सामान्यतः: अडीच ते तीन किलो असते. हे वजन मूल पंधरा महिन्याचा होईस्तोवर दुप्पट व्हायला हवे. आईचे दूध आवश्यक प्रमाणात मिळाल्याने पाच-सहा महिन्याच्या मुलाचे वजन दुप्पट होते. मूल सहा महिन्याचे झाल्यावर त्याच्या आहाराकडे दुर्लक्ष व्हायला लागते. त्यामुळे मुलांचे वजन वर्षभरात जन्माच्या वेळेपेक्षा तिप्पट होण्याचा आनंद क्वचितच पालकांना घेता येतो.

पहिल्या वाढदिवसानंतर वजन वाढण्याची गती कमी व्हायला लागते. दोन वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलांचे वजन जन्माच्या वेळेपेक्षा चौपट वाढते. (म्हणजे जन्माच्या वेळी अडीच तर दोन वर्षात दहा किलो). त्यानंतर दरवर्षी एक किलो वजन वाढते.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
मुलांची उंची
फक्त आईचेच दूध बाळाला
कृमीनाशक औषध म्हणजे नागरमोथा
बदामाचा उपयोग ताकद वाढविण्यासाठी केला जातो
पोटात दुखल्यास वावडिंगाचा वापर करावा
बाळहरड्याचा उपयोगाने खोकला बरा होतो