स्थूलपणा धोकेदायकच!

शरीरावर अतिरीक्त चरबी वाढत असल्याने आपण स्थूल होत असतो. त्यमुळे आपल्याला आवश्यक वजनापेक्षा 20 टक्क्याने वजन वाढत असते. स्थूलतेमुळे आपल्या आरोग्यावरही अनेक प्रकारचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे अकाली मृत्यु सुध्दा ओढवू शकतो. स्थूलपणा उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कर्करोगासही कारणीभूत ठरत असतो.स्थूलपणाची कारणे-* अतिप्रमाणात खाणे आणि कमी शारीरिक श्रम दोघेही मिळून स्थूलपणा निर्माण करतात. * ऊर्जेचं ग्रहण आणि ऊर्जेचा खर्च यांच्यात तीव्र असमतोल झाल्यानं स्थूलपणा आणि लठ्ठपणा उद्भवतो. * आहारातून अतीप्रमाणात चरबी घेण्यामुळंही स्थूलपणा येतो.* गुंतागुंतीची वर्तणूक आणि मानशास्त्रीय कारणांमुळं देखील अति अन्नसेवन आणि परिणामी लठ्ठपणा येतो. ऊर्जेच्या वापरातील चयापाचयिक चुका मेद साठण्यास उत्तेजन देऊ शकतात. * बालपण आणि पौगंडावस्थेतील स्थूलपणा यांच्यामुळं प्रौढावस्थेत स्थूलपणा येऊ शकतो. महिलांमधे, गर्भधारणेच्या वेळेस आणि रजोनिवृ्त्तीनंतर स्थूलपणा येतो.वजन कसे कमी कराल!* तळलेले अन्न कमी खावे. * फळे आणि भाज्या अधिक प्रमाणात खाव्यात. * संपूर्ण धान्य, हरभरे आणि मोडवलेलं धान्यं यांसारखे तंतुमय अन्न पदार्थ अधिक प्रमाणात खावेत. * शरीराचं वजन सामान्य पातळीत राखण्यासाठी नियमितपणे व्यायाम करावा. * शरीराचं वजन हळू आणि स्थिरपणे कमी करणे हितकारक. * अती प्रमाणात उपवास करण्यानं आरोग्य धोक्यात य़ेऊ शकतं. * आपल्या शारीरिक कार्यांचा समतोल राखण्यासाठी आवश्यक विविध प्रकारचे अन्न पदार्थ खावेत. * अन्न थोडे-थोडे आणि नियमित अंतराने खावे. * साखर, चरबीयुक्त पदार्थ आणि मद्याचे प्रमाण कमी करावे. * कमी स्निग्धता असलेले दूध घ्यावे. * वजन कमी करणारा आहार हा प्रथिनांनी समृध्द आणि कर्बोदकं तसंच चरबी कमी असलेला असावा.