कविता | मुलांचे ‍विनोद | कोडी | अमरचित्रकथा | कथा
मुख्य पृष्ठ » विविध » बाल जगत » कथा » भारंड पक्ष्याची दोन तोंडे
 

bird
Shreya
WD
एका तळ्यात एक पक्षी होता. त्याचे नाव भारंड. त्याला दोन तोंडे होती. एकदा एका तोंडाला अमृतासारखे गोड फळ मिळते. तेव्हा दुसरे तोंड त्यातले अर्धे चवीसाठी ते फळ मागते. पण पहिले तोंड त्याला सांगते की ''तू खाल्लं काय आणि मी खाल्लं काय.... शेवटी पोट एकच असल्याने प्रश्न येत नाही! त्यापेक्षा अर्धे फळ आपल्या बायकोला देऊया. ''

हे ऐकून दुसऱ्या तोंडाला वाईट वाटते. त्या दिवसापासून दुसरे तोंड निराश असे. एके दिवशी विषारी फळ दुसऱ्या तोंडास मिळते. तेव्हा पहिले तोंड त्यास ते फळ न खाण्याचा सल्ला देते. पण त्या दिवशी अमृतासारखे फळ न दिल्यामुळे रागाने दुसरे तोंड ते विषारी फळ खाते. त्यामुळे अर्थातच भारंड पक्षी मरण पावतो.

तात्पर्य : एकोप्यात बेबनाव होऊ देऊ नये!
• Play Free Online Games Click Here
• Blogs, Videos and More Click Here
• Send Musical and Animated Cards Click Here
• Simple,Fast & Free Email Service Click Here
संबंधित माहिती शोधा