कविता | मुलांचे ‍विनोद | कोडी | अमरचित्रकथा | कथा
मुख्य पृष्ठ » विविध » बाल जगत » कथा » सिंहीण आणि कोल्ह्याचे पिल्लू
 

story
WD
एका जंगलात सिंहिणीला दोन छावे झाले. सिंह रोज सिंहिणीसाठी आणि छाव्यांसाठी एक प्राणी मारून घेऊन येई. पण एके दिवशी सिंहाला कोणताच प्राणी न मिळाल्याने घरी परत येताना, कोल्ह्याचे छोटे पिल्लू सापडते. ते पिल्लू ठार न करता जिवंतपणे सिंहिणीसाठी घेऊन जातो. सिंह सिंहिणीला कोणतीच शिकार मिळाली नाही, पण हे कोवळं पिल्लू मात्र सापडल्याचे सांगतो. आणि सिंहिणीला त्या पिल्लास ठार न करण्याची विनंती करतो. सिंहिणीच्या मनात त्या कोल्ह्याच्या पिल्लासंबंधी माया उत्पन्न होते. सिंहीण आपल्या दोन छब्यांबरोबर त्या पिल्लाला वाढवतो.

एके दिवशी एक रानहत्ती दिसल्यावर सिंहाचे दोन छावे त्याच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करतात, पण कोल्ह्याचे पिल्लू अंगावर जाण्याचा प्रयत्न करतात, पण कोल्ह्याचे पिल्लू त्यांना सांगते की, ''हत्ती हा तुमच्या कूलाचा शत्रू आहे. तेव्हा त्याच्यासमोर जाऊ नका. '' सिंहाचे छावे त्यामुळे नाउमेद होऊन घरी येतात. घरी आल्यावर ते छावे सिंहाकडे कोल्ह्याबद्दल तक्रार करतात, '' हा, हत्तीला बघून घाबरला आणि आम्ही हल्ला करीत होतो तर आमच्याही आड आला. ''

story
WD
छब्यांचे बोलणे ऐकून कोल्ह्याला राग येतो. तो त्या छाव्यांची चांगलीच खरडपट्टी काढतो. तेव्हा सिंहीण त्याला एका बाजूला नेऊन समजावते की तू पण हुशार आहेस.... शूर आहेस, पण ज्या कूलात तुझा जन्म झाला त्या कूलात हत्तीला ठार मारण्याची शक्ती कोणातच नव्हती. म्हणूनच माझ्या छाव्यांना तू कोण आहेस हे कळण्याआधीच इथून निघून जा. कोल्ह्यांच्या कळपात तुला आश्रय नक्की मिळेल. नाहीतर काही दिवसांनी माझेच छावे तुला ठार मारतील. ''

सिंहिणीचे उद्गार ऐकून कोल्हा धूम ठोकतो.

तात्पर्य : अशक्य गोष्ट साध्य करण्यात आपली कुवत तेवढी आहे का ते ओळखलं पाहिजे.
• Play Free Online Games Click Here
• Blogs, Videos and More Click Here
• Send Musical and Animated Cards Click Here
• Simple,Fast & Free Email Service Click Here
संबंधित माहिती शोधा