मुख्य पृष्ठ > विविध > साहित्य > प्रसिध्द लेखक > 'लेखनाचे संस्कार सोडून जात नाहीत'
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'लेखनाचे संस्कार सोडून जात नाहीत'
PRvivek ranade
लेखक आपले शब्द कागदावर उमटवतो, वक्ता ते श्रोतृहृदयावर उमटवतो. कागदावरचे शब्दसुद्धा कालांतराने विसरले जाऊ शकतात. काही काळ त्यांनी केलेला संस्कार बाकी कायम राहतो. पुढे पुढे लेखकाचे व पुस्तकाचे नावही लक्षात राहत नाही. पण त्या लेखकाने आपल्या लेखनाद्वारे केलेले संस्कार माणसाला सोडून जात नाहीत. लेखनामुळे त्याच्या वृत्तीत, जाणिवेत व एकूणच मानसिकतेत जो सूक्ष्म बदल झालेला असतो, तो तात्काळ लक्षात येत नाही. विद्वत्ता व बहुश्रुतता प्रदर्शित करण्यासाठी पुष्कळदा लेखनातील काही अंश उपयुक्त ठरतात ही गोष्ट खरी आहे. पण त्या उद्धरणांचा माणसाच्या मानसिकतेशी संबंध अल्प असतो व प्रदर्शनप्रियतेशी अधिक असतो. व्याख्यानाच्या बाबतीत तेवढे करता न आले, तरी अंतरिक संस्कारशीलतेच्या दृष्टीने लेखन आणि वक्तृत्व यांच्यातील साम्य लक्षात यायला हरकत नाही.

(पणजी येथे १९९४ मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनातील भाषणाचा सारांश)

( छायाचित्र सौजन्य विवेक रानडे)
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
शेवाळकरांचे साहित्य जगतातील योगदान
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व
बदलणार्‍या प्रवृत्ती हेच माझ्या नाटकाचं मूळ- तेंडूलकर
परखड नाटककार
एका बारबालेची कहाणी
माणूसपण प्रवर्तित करणारा साहित्यिक