' कशी आहे?'' बरी आहे.' ' काय करतेस?' ' रेटेत आहे.' ' कोण सोबतीला?'' माझी मीच.' ' हत् वेडे, इतका भरभक्कम आधार!मग रेटते आहे काय म्हणतेस ?सुसाट वेगाने पळते आहे म्हण.असा आत्मनिर्भर, निरकुंश आधारभल्या भल्यांना दुर्मिळ ! तुझी तूच होऊन राहा. मुक्कामच येईल सामोरा तुलादोन्ही भुजा उभारूनअभिवादन करेल तुलामग तूच विचारशील मला' काय? बरी आहेस ना? ' |