मुख्य पृष्ठ > विविध > साहित्य > कथा > समाधान
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
समाधान
- प्रकाश दांडेकर

माझ्या घराच्या जवळच दामुअण्णा जोशींती 'अन्नपूर्ण शाकाहारी भोजनालय' या नावाची खानावळ आहे. या खानावळीचे मालक, नोकर, वाढपी व स्वयंपाकी सर्व काही वयाची पन्नाशी उलटलेलं दामूअण्णाच आहेत. दामूअण्णांचे वडील लहानपणीच गेले. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने दामूअण्णांच्या आईने लोकांच्या घरी स्वयंपाक करून घर चालवलं. तिला मदत करतानाच दामूअण्णांनी रुचकर स्वयंपाक कसा करायचा याच ट्रेनिंग घेतलं होत. घरची गरिबी, वडिलोपार्जित काहीच जंगम नाही. त्यात शिक्षणही नाही. सातवीपर्यंत जाऊन नापास झाल्याच शिक्का तेवढा कपाळावर होता. दिसायलाही ओबड, धोबड. अशात दामूअण्णांना आपली मुलगी कोण देणार? मग नाईलाजाने का होईना दामूअण्णा 'ब्रह्मचारी'च राहिले. पण त्याची त्यांना अजिबात खंत नव्हती. कारण त्यांनी अत्यंत कष्ट करून उभी केलेली अन्नपूर्णा खानावळच त्यांचा संसार होता.

दामूअण्णांचे नित्यकर्म म्हणजे पहाटे चार वाजता उठायचं. मुखमार्जन करून खानावळीचा केर काढून स्वच्छता करायची. नंतर अंघोळ करून सात वाजता मंडईत जाऊन ताजी भाजी व इतर सामान घेऊन याचयं व लगेच स्वयंपाकाला लागायचं. डाळ, तांदूळ निवडून शिजत ठेवायचे. पोळ्यांकरीता कणिक मळून ठेवायची. दुपारी 12 पर्यंत लोक जेवायला येऊ लागाचये. तोपर्यंत दामुअण्णाचा स्वंपाक तयार असायचा. दामुअण्णा आपल्या हाताने गरम-गरम जेवण ग्राहकांना वाढायचे. दुपारी दोन वाजेपर्यंत जेवणी आटोपल्यानंतर दामुअण्णा स्वत: जेवायचे व लगेच उष्ट्या भांडी, ताट, वाट्या घासून संध्याकाळची तयारीला लागायचे. वरण भाताचा कुकर पुन्हा लावायचा. भाजी चिरून फोडणीला टाकायची. कोशिंबीर, चटणी, पापडाची तयारी करायची इतकं करता करता संध्याकाळचे सात वाजायचे. पुन्हा जेवणारे ग्राहक यायचे त्यांचं भोजन करून रात्री दहा वाजता अण्णाची खानावळ बंद झाल्यावर अण्णा थोडे बहुत जेवायचे. पुन्हा भांडी घासायची. सकाळी मंडीतून काय सामान व भाजी आणायची आहे, याची यादी करायची. इतकं सर्व काम आटोपायला अण्णांना रात्रीचे बारा वाजायचे तेव्हा अण्णा खानावळीत सतरंजी अंथरून झोपून जायचे व चार वाजता सकाळी उठून पुन्हा त्यांचा नित्यकर्म सुरू करायचे.

  जीवनात सुख लाभण्यासाठी समाधानाची शिदोरी बाळगणार्‍या दामुअण्णांसारखं मन मोठं असावं लागत. बस्स, बाकी काही नाही.      
दामुअण्णांसारखा कष्टाळू मनुष्य मी आपल्या संपूर्ण आयुष्यात पाहिला नव्हता. अण्णा माझ्या घराच्या जवळच रहायचे म्हणून मधून-मधून मी त्यांची विचारपूस करत रहायचो. अण्णांना विचारायचो - 'काय अण्णा कस काय चललंय' तेव्हा अण्णा म्हणायचे - 'देवाजीची अपार कृपा आहे जीवन सुखासमाधानाने चाललंय. '

या उलट मी एका सरकारी नोकरीमध्ये चांगल्या पगारावर 'परमनंट नोकर' आहे. घर आहे. घरात फ्रीज, कलर टी. व्ही., कॉम्प्युटर, सीडी, प्रत्येकाच्या वेगळा मोबाईल, तीन टू व्हीलर्स सर्व काही आहे.

घरात सुंदर, सुशील, शिकलेली व नोकरी करून कमावून देणारी आज्ञाधारक पत्नी आहे मुलं पण सुसंस्कारी व हुशार आहे. मला दहा ते पाच नोकरी केल्यानंतर काहीच टेन्शन नाही. दरवर्षी इंक्रिमेंट मिळतं. डि. ए. वाढल्याने आपसूकच पगारवाढ होते तरी मी नेहमी टेन्शनमध्येच असतो. कधी ऑफिसमध्ये काम जास्त पडलं तर नशिबाला दोष देतो.

हे सर्व पाहून मला वाटत की जीवनात सुख लाभण्यासाठी समाधानाची शिदोरी बाळगणार्‍या दामुअण्णांसारखं मन मोठं असावं लागत. बस्स, बाकी काही नाही.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: समाधान, story samadhan
आणखी
सुटका
तमाशा
राजाची लोकशाही
संस्कार
मानवी बॉम्ब
मुलाचे पाय