मुख्य पृष्ठ > विविध > लव्ह स्टेशन > बहर प्रेमाचा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
असे अचानक  Search similar articles
- अमोल कपोले

love
ND
असे अचानक मनात माझ्या
मोर नाचले जग हे सारे

क्षणात एका नवे भासले
अशी अचानक कळू लागली पाखर वाणी

flower
ND
फुलाफुलांतून स्वरून आली नवीच गाणी
असे अचानक सुरात एका गीत गवसले

अबोलातले अर्थ अनोखे मनात हसले
अशी अचानक अंतरातली ओळख पटली

love
ND
नवजीवनाची पहाट मजला अशी भेटली
असे अचानक जवळी येता दोघे आपण

मने उमलली गेले सरूनी
अवघे मीपण !
आणखी
एक दिवस असंच..
'प्रेमात पडतांना'
ओढ-अंतरीची
जीवलागण
प्रेम