मुख्य पृष्ठ > विविध > लव्ह स्टेशन > बहर प्रेमाचा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
प्रिया प्रिया प्रिया‍ ऽऽऽऽऽऽ  Search similar articles
स्व. सौ. मीना आठल्ये

पाहते प्रिया मी वाट
पसरल्या धुक्यात दाट
पश्चिमेस उधळले केशरी रंग सांजचे
पाखरेही परतली शिखांतरीच जायचे
मृदुल रेशमी बंधनात
पाहते प्रिया मी वाट।।1।।

कुंज रातराणीचे धुंद गंध उधळुनी
धरा अधीर जाहली अमृत सिंचन प्राशनी
प्रीतीमाळ करतलात। पाहते प्रिया मी वाट।।2।।

आर्त भाव आळविले प्रीतीगीत गुंफिले
सूर सूर जुळविले हृदयतार छेडिले
मधुर मानस मंदिरात। पाहते प्रिया मी वाट।।3।।
आणखी
जीवन सागर
असे अचानक
एक दिवस असंच..
'प्रेमात पडतांना'
ओढ-अंतरीची
जीवलागण