व्हॅलेंटाईन डे | प्रेमाची गोष्ट | मैत्री दिन | प्रेमात पडताय? | बहर प्रेमाचा | लव्हेबल गाणी | प्रेम म्हणजे... | लव्हलेटर
मुख्य पृष्ठ » विविध » लव्ह स्टेशन » बहर प्रेमाचा » तुझ्याच साठी
Feedback Print Bookmark and Share
 

love station
ND
सजलो तुझ्यासाठीच
हसलो तुझ्यासाठी ।।
खेळात रंगतांना
हरलो तुझ्यासाठीच.....

नशिबात व्हायचे ते
मी भोगले कधीचे ।।
चटके उन्हातले मी
साहतो तुझ्याचसाठी.....

जेव्हा कधी तुझ्याशी
वाटे रमून जावे ।।
तुडवित खाच खळगे
येतो तुझ्याचसाठी ....

जाऊ नको मला तू
सोडून दूरदेशी ।।
जे मागशील मजला
देतो तुझ्याचसाठी...

स्वप्नातल्या सुखांना
सजवू नको कधीही ।।
प्रत्यक्ष मीच आता
येतो तुझ्यासाठीच...

आला वसंत फुलूनी
बहरात यौवनांच्या ।।
हृदयातल्या गीतांना
गातो तुझ्यासाठी....
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: तुझ्याच साठी