| | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमर अकबर अँथनीतला 'दोही दिया पर क्या सॉलीड दिया' हा डॉयलॉग उधृत करून राज ठाकरे यांनी त्यांना या निवडणुकीत उतरण्याने काय अपेक्षित होते तेच सांगून टाकले. या निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडून येतील ही खात्री कुणालाच नव्हती, शिवसेना-भाजप युतीला ते धक्का देतील हा अंदाज होताच. पण युतीला मुंबई-ठाण्यातून जवळपास उखडून टाकतील असे मात्र वाटले नव्हते.कल्याणची जागा वगळता मुंबई व ठाण्यातील नऊ जागांवर मनसेच्या उमेदवारांनी कमीत कमी एक.... |