स्वर्गीय संजय गांधी व भाजपची खाजदार श्रीमती मेनका गांधी यांचा मुलगा वरुण गांधी प्रक्षोभग वक्तव्य केल्याने सध्या तुरूगांची हवा खात आहे. लोकसभा निवडणुकीत पीलीभीत येथील भाजपचा उमेदवार वरूण गांधी आज तुरूंगात असला तरी त्याच्यासाठी हा काळ फायदा मिळवून देणारा आहे.
भारतीय राज्य घटनेनुसार मनुष्याला जन्मत:च मुलभूत हक्क प्रदान केले आहेत. या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या राज्य सरकारची असते. मुलभूत हक्कांमध्ये भाषण, संचार, शिक्षण, प्रचार स्वांतत्र्य इत्यादी अनेक अधिकार येतात. राज्य...