आर्थिक मंदीमुळे सर्वच क्षेत्रात कपात करण्यात येत आहे. टाटा मोटर्सलाही या काळात चांगलाच फटका बसला आहे. अशा काळातही कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी 'गुड न्यूज' कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना 15.27 टक्क्यांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे.
कंपनीला पहिल्या तिमाहीत 329 कोटीचा फटका बसला आहे. यानंतरही कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मल्टी एक्सेल वाहन तयार करणाऱ्या प्रकल्पातील सहा हजार कर्मचाऱ्यांना 22652 ते 26958 रुपयांचा फायदा होणार आहे.