वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » अमेरिकेत रोजगाराच्या संधी वाढल्या
Feedback Print Bookmark and Share
 
मंदीचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाल्याने अमेरिकेतील बेरोजगारीही कमी होण्यास सुरुवात झाली असून, मागील वर्षभराच्या कालावधीची आकडेवारी पाहता बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत घसरण झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अमेरिकी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या संदर्भात आकडेवारी जाहीर केली असून, बेरोजगारांचे प्रमाण कमी झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीत बेरोजगारांच्या संख्येत 33000 ची घसरण झाली असून, आता ती केवळ 5 लाख 21 हजारांवर आली आहे.

मंदीतून बाहेर पडण्याचा अनेक कंपन्यांनी प्रयत्न सुरू केल्यानंतर मागील काही दिवसात कंपन्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने बेरोजगारी कमी होत असल्याचे कॅरी लीहे या अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
संबंधित माहिती शोधा