वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » ATF दरात नऊ टक्क्यांची वाढ
Feedback Print Bookmark and Share
 
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती गगनाला भिडल्यानंतर आता देशातील तेल कंपन्यांनी विमानांसाठी लागणाऱ्या एटीएफ दरात नऊ टक्क्यांची वाढ केली आहे. हे दर आता 39 हजार रुपये प्रती किलोलीटरवर आले आहेत.

आयओसीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मध्य रात्रीपासूनच नवीन दर लागू करण्यात आले आहेत. या दरात 3,400 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर घसरल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तेल कंपन्यांनी एटीएफ दरात मोठी कपात केली होती. आता पुन्हा एकदा या दरात वाढ करण्यात आली आहे.
संबंधित माहिती शोधा