देशात दुष्काळ पडल्याने महागाई वाढली असून, आगामी तीन ते चार महिन्यांमध्ये महागाई संपेल असी आशा केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
खरीप पिकांचे नुकसान झाल्याने धान्याचे भाव वधारले आहेत. यामुळे दुष्काळाने धान्य तुटवडा निर्माण झाला आहे. आता रबी पिकांवर साऱ्या आशा असून, तीन ते चार महिन्यात महागाई कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
रबी पिकांची कापणी झाल्यानंतर धान्यांच्या आगामी दरांविषयी सांगता येणे शक्य असल्याचे सांगत आताच या विषयी काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.