डॉलरचे दर सातत्याने घसरत असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. याचाच परिणाम म्हणून आता सोने चक्क 18 हजार तोळे होण्याची शक्यता असून, दिल्ली बाजारात आठवडाभरापासून सोने 17600 रुपयांवर आहे.
मंदी, आर्थिक संकट, निर्यातीत घसरण अशा विविध कारणांमुळे आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळे देशातील जवळपास एक लाख दोन हजार 951 उद्योगांना 'आजारी' म्हणून जाहीर करण्यात आले असून, मागील तीन वर्षातच देशात 93 मध्यम उद्योगांचेही आर्थिक आरोग्य बिघडले आहे.