मंथन | बाबा आमटे | मराठी दिन | गांधी जयंती | सावरकर | ब्लॉग-कॉर्नर
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » आज-काल » मंथन » पंजाबातील डेरे आणि संघर्ष
Feedback Print Bookmark and Share
 
NDND
पंजाबमध्ये शीखांच्या दोन गटांत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीची बीजे उच्चनीचतेच्या भावनेत दडलेली आहेत. हा संघर्ष दोन गटांचा नाही, तर दोन भिन्न सामाजिक परिस्थितीत रहाणार्‍यांचा अर्थात, सवर्ण आणि दलितांमधला आहे. पंजाबमध्ये डेरे काही कमी नाहीत. शीख हा इथला मूळ धर्म असला तरी आणि गुरू नानकांपासून ते गुरू गोविंदसिंगांपर्यंत सगळ्या गुरूंनी सर्व जाती त्यात एकवटल्या असल्या तरी या जातींची स्वतंत्र अस्मिता आता डोके वर काढू लागली आहे. शीख धर्माच्या झेंड्याखाली एकवटलेला पंजाब आता या डेर्‍यांत वाटला गेला आहे. काय आहेत हे डेरे आणि काय आहे त्यांचे भांडण?

शीखांचे दहावे गुरू होते, गुरू गोविंदसिंग. शीखांमधली गुरू परंपरा त्यांनी आपल्यापर्यंत थांबवून गुरू ग्रंथसाहिब या ग्रंथालाच गुरू मानावे असा आदेश सर्व शीखांना दिला. 'आगिआ भई अकाल की तवी चलाओ पंथ।। सब सिखन को हुकम है गुरू म‍ानियो ग्रंथ।।' हाच तो आदेश. तेव्हापासून गुरू ग्रंथसाहिब हा शीखांचा पवित्र धर्म बनला. हा ग्रंथ कुणी एकाने लिहिलेला नाही. यात देशभरातील सर्व धर्मिय संतांचे विचार आहेत. शीखांमध्ये दहा गुरू आहेत. त्यापैकी सहा गुरूंचे विचार यात आहेत. याशिवाय विविध १५ संतांचे (ज्यांना भगत असे म्हणतात.), शीख धर्म अवलंबलेल्या चार गुरूसिक्खांचे आणि ११ भट्ट यांचे विचारही यात सामील करण्यात आले आहेत. यातील पंधरा संतांमध्ये महाराष्ट्रातील संत नामदेवांसह, कबीर, शेख फरीद यांच्यासह संत रोहिदास यांचाही समावेश आहे.

शीख समाज एकत्र झाला तरी पुढे यात नवे संत तयार होत गेले. पण या संतांना गुरू म्हणून मान्यता कधी मिळाली नाही. कारण गुरू गोविंदसिंगांनी गुरू परंपरा आपल्यानंतर संपवली होती. त्यामुळे या संतांना मान मिळत राहिला. पण गुरू म्हणून मान्यता नाही. तरीही त्यांना मानणार्‍या समर्थकांचा वर्ग सुस्थापित झाला. शीखांमध्ये उच्चनीच अशी भावना नाही. म्हणूनच अनेक दलित जाती शीख धर्मात सामील झाल्या. पण त्यातल्या अनेक जातींना नंतर आपल्याला समानतेची वागणूक मिळत नाही, असे वाटले आणि त्यातून स्वतंत्र डेर्‍याची स्थापनाही झाली. म्हणजेच डेरा स्थापनेला जातीय परिणाम मिळाले.

डेरा सचखंड
'डेर सचखंड'ची स्थापना होण्यासाठी हीच परिस्थिती कारणीभूत ठरली. जालंधरपासून वीस किलोमीटरवर बल्लन या गावी ७० वर्षांपूर्वी या डेर्‍याची स्थापना झाली. या डेर्‍याचे लोक स्वतःला यापेक्षा वेगळ्या धर्माचे मानतात. संत रोहिदास किंवा रविदासांना ते मानतात. त्यामुळे आपल्याला ते रविदासिए असे म्हणवतात. पूर्वी अगदीच छोटा असलेला हा डेरा आता चांगलाच विस्तारला आहे. अनेक खालच्या जातींना त्याने आपल्या कवेत घेतले आहे. पंजाबमध्ये तब्बल ३९ अनुसुचित जाती आहेत. त्यातल्या अनेक या डेर्‍यात आल्या आहेत. शीखांमध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. पण या डेर्‍यातील लोक मूर्तीपूजा करतात. या पंथियांचे स्वतंत्र रोहिदास गुरूद्वारे किंवा रोहिदास मंदिरेही आहेत. संत रोहिदासांना त्यांचे अनुयायी भक्त नव्हे, तर गुरू मानतात. शीखांपेक्षा हा धर्म इथेच वेगळा ठरतो. कारण गुरूग्रंथसाहिबनंतर शीखांमध्ये मानवी गुरू नाही. ही मंडळी दिसतात शीखांसारखीच. दाढीधारी, पगडी घातलेली ही मंडळी स्वतःला रविदासिए म्हणवतात.

शीखांचे त्यांच्याशी भांडण आहे, ते याच मुद्यावर. संत रोहिदासांच्या अभंगांना आम्ही गुरू ग्रंथसाहिबमध्ये सामावून घेतले आहे. त्यामुळे त्यांना स्वतंत्र गुरू म्हणून मान्यता का द्यावी असे शीखांचे म्हणणे आहे. गुरू परंपरा संपली आहे, याचा दाखलाही ते गुरू गोविंदसिंगांच्या वचनाचा दाखला देऊन सांगतात. त्यांच्या शीखांसारख्या रहाण्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि हा शीखांमध्ये फूट पाडण्याचा कट असल्याचे शीखांचे म्हणणे आहे.
 
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: डेरा सचखंड