| | कुरूलकरांनी सहा महिन्यांपूर्वी आपल्या ग्रंथायन संस्थेतर्फे सर्व प्रकारची पुस्तके महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचविण्याचा संकल्प सोडला. त्यांच्या दहा मोबाईल व्हॅन राज्यातल्या गावागावात जाऊन पुस्तक विक्री करतात. शिवाय त्यांनी दिलेल्या टोल फ्री नंबरवर फोन करून कुणीही इतर कोणत्याही खर्चाविना घरपोच पुस्तक मागवू शकतो. या उपक्रमाला सहा महिने झाले आहेत. या काळात त्यांना काय अनुभव आला हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा 'मस्त, झकास, फॅब्लुलियस' या शब्दांनीच स्वागत झालं. 'लोकं वाचतात, आपण पोहोचत नाही', हा त्यांनी सहा महिन्याअंती काढलेला 'लसावी' आहे.
त्यांच्या मते महाराष्ट्रात..... |