सुमारे 25 वर्ष जुन्या असलेल्या इंटरनेट अॅड्रेस पध्दतीत लवकरच व्यापक स्वरूपात बदल करण्यासंबंधीचा निर्णय इंटरनेट प्रणालीवर लक्ष ठेवणा-या आयसीएएनएन या संस्थेने घेतला आहे.
नवीन डोमेन नावांमध्ये सुधारणा करण्याबाबत द इंटरनेट कार्पोरेशन फार असाइन्ड नेम्स अँड नंबर्स (आयसीएएनएन) या संस्थेतर्फे अभ्यास केला जात आहे. यासंदर्भात नवीन दिशा-निर्देश दिल्यानंतर हजारो इंटरनेट एड्रेस डॉट कॉम व डॉट एलएटी यांनी जोडले जाणार आहेत.
इंग्रजी भाषेचा वापर करू न शकणा-या व इंग्रजी बोलता न येणा-यांसाठी इतर भाषांमध्ये एड्रेस देण्याची सोय असावी या मागणीबाबतही आयसीएएनएन विचार करीत आहे.
इंगजी व्यतिरिक्त भाषांमध्ये इंटरनेट एड्रेस देता येत असला तरीही त्यासाठी मुळाक्षरे 'ए' ते 'झेड' व 0 से 9 आणि एक हायफन पर्यंतच मर्यादीत आहे. नवीन निर्देशांनुसार कंपनी आणि इतर समुहांसाठी नवीन मुळाक्षरांना मंजुरी मिळणार आहे. आयसीएएनएन ने 2000 आणि 2004 मध्ये स्थनिक भाषा स्वीकारली असली तरीही त्यावर अंमलबजावणवी आता केली जाणार आहे. याप्रमाणेच पोस्टल सेवांसाठीही डॉट पोस्ट गेल्या 4 वर्षांपासून प्रलंबित आहे.
|