ब्रिटिश सरकारने 'ब्लॅक बॉक्स' ही नवीन टेक्नॉलॉजी विकसीत केली असून याव्दारे जगभरात सुरू असणा-या इंटरनेट सर्फिंगच्या सगळ्या हालचालींचे रकॉर्ड ठेवण्याची योजना बनविली आहे. ब्रिटिश गृह विभागाने हा प्रस्ताव विचाराधीन ठेवला आहे. इंटरनेटवरून होणा-या सगळ्या डेटा ट्रान्सर्फरवर सरकारचे लक्ष रहाणार आहे. वेबसाईट, सर्च इंजनवरील आपल्या दौ-यांपासून ईमेल, चॅटींग आणि टेलीफोन कॉल पर्यंत सगळे रेकॉर्ड करून सरकारी डेटाबेसमध्ये टाकण्यात येणार आहे. आतंकवाद आणि गंभीर गुन्हांवेळी गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली सुरक्षाव्यवस्था अत्याधुनिक करण्याचा ब्रिटीश सरकारचा हेतु आहे. याबाबत वरीष्ठ पोलिसअधिका-यांनी बैठक घेऊन इंटरनेट सेवा देणा-या कंपन्यांशी चर्चा केली. गोपनियतेच्या गप्पा मारणा-यांना ही प्रणाली रूचलेली नाही. मात्र, इंटरनेटच्या मदतीने गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याने सरकारचे म्हणणे आहे. अशा या प्रणालीव्दारे इंटरनेटवर नियंत्रण आणि मॉनीटरिंग करणे नवीन गोष्ट नाही. चीनने अशी प्रणाली यापूर्वीच विकसीत केली आहे. 11 सप्टेंबर 2001 च्या घटनेनंतर अमेरिकी गुप्तचर संघटनेही या प्रणालीचा आधार घेतला आहे. स्वीडनमध्येही 2009 पासून या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. इंटरनेटवरील हालचलींवर लक्ष ठेवणा-या देशांची संख्या वाढत आहे. त्यामुळस प्रिय वाचकहो... आता जेव्हा तुम्ही इंटरनेट सुरू करून वापर सुरू कराल तेव्हा तुमच्यावर कोणाचेतरी लक्ष आहे, हे लक्षात असू द्या. |