जागतीक मंदीच्या सध्याच्या तणावाच्या वातावरणात भारतातील दोन कंपन्यांनी गोड बातमी दिली आहे. सूचना प्राधिकरणातील इंन्फोसिस टेक्नॉलॉजी या कंपनीने कर्मचा-यांची भरती सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे इंजीनियरिंग आणि निर्माण क्षेत्रातील लार्सन एंड टूब्रो या कंपनीनेही आपल्या अगामी 3 वर्षातील नव्या संयुक्त उपक्रमांसाठी 10 हजार युवकांची भरती सुरू ठेवली आहे. इंफोसिस टेक्नॉलॉजीचे सहअध्यक्ष नंदन एम. निलेकानी यांनी इंडिया इकॉनॉमिक समिटच्यावेळी सांगितले की, सध्याच्या मंदीच्या वातावणातही आमच्या कंपनीने चांगल्या युवकांना सामावून घेण्याची प्रक्रीया सुरू ठेवली आहे. सूचना प्राधिकरण क्षेत्रात गेल्या चार वर्षात दिसून न आलेली मंदी या आर्थिक वर्षात आहे. टाटा कंसलटन्सीनेही याच वर्षात 30 ते 35 हजार युवकांची भर्ती करण्याची योजना बनवली असल्याचे समजते. लार्सन एंड टूब्रोचे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक ए.एम. नायक यांनी सांगितले, चालू आर्थिक वर्षात कंपनीच्या उत्नन्नावर काहीच परीणाम होणार नाही आणि पुढील 3 वर्षात कंपनी देशात 10 हजार नवी भरती करेल. ते म्हणाले कंपनीकडून रेल्वे, वीज आणि जहाज क्षेत्रात नवे संयुक्त उपक्रम राबवणार आहे. त्यामुळे जास्तकरून टेक्नॉलॉजी क्षेत्रात भरती केली जाईल, असे ते म्हणाले. |