चंद्रावर घरकुल करण्याचे मानवाचे स्वप्न आता जवळजवळ सत्यात उतरत आहे. त्यानंतर आता अंतराळात इंटरनेटचा वापर करायचे स्वप्न पहात असलात तर त्यासाठीही एक गुड न्युज आहे. अंतराळात इंटरनेटचा वापर करता यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. गूगल आणि नासा संयुक्तपणे हे स्वप्न सत्यात उतरविण्याच्या कामाला लागले आहेत. त्यांच्या प्रयत्नाने आता नेट सर्फिंग अंतराळातही करणे शक्य होणार आहे. सुरूवातीस रेडियो उपकरणासाठी याचा उपयोग केला जाईल. रेडियो उपकरणाच्या संदेश आदान-प्रदानासाठी केवळ एक वेळच उपयोग करता येणार आहे.पण, हे काम इतके सोपे नाही. हे तंत्रज्ञान विकसीत करण्यामध्ये अनेक अडथळे आहेत. पृथ्वीचे सातत्याने फिरणे हा प्रमुख अडथळा आहे. सातत्याच्या गतीमुळे संदेश पाठविणा-याला आणि प्राप्त करणारा या दोघांच्याही जागा बदलत राहतील. अंतर हे देखील यातील दुसरा अडथळा आहे. जास्त अंतरामुळे संदेश पोहचण्यासाठी जास्त वेळ लागेल. |