मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > आयटी/ माहिती व तंत्रज्ञान > आयटीच्या जगात > आता इंटरनेटवरून फिल्म पायरसी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आता इंटरनेटवरून फिल्म पायरसी
WD
इंटरनेटवर सर्वप्रकारच्या साईट उपलब्ध आहेत. यामध्ये व्हिडीओही शेयर केले जातात. माहिती पुरविणे हा या साईटचा मुख्य उद्देश असतो. पण, अलीकडच्या काळात इंटरनेटचा गैरवापर होण्याचे प्रमाण वाढले आहे. माहिती घेण्यापेक्षा सायबर क्राईमचा अधिक वापर होऊ लागल्याने इंटरनेटची डोकेदुखीच अधिक झाली आहे. आजकाल दहशतवादासाठी इंटरनेटचा वापर केला जाऊ लागलाय. इंटनेटच्या दुरूपयोगाचा फटका बॉलीवुडलाही बसलाय. सिडी पायरसीमुळे घायकुतीला आलेले निर्माते इंटरनेटवरून फिल्म पायसीमुळे अधिकच अडचणीत आले आहेत.

निर्माते कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक करून चित्रपट निर्मिती करतात. आपला चित्रपट जास्तीत-जास्त टॉकीजमध्ये चालेल आणि पैसा वसूल होईल, अशी त्यांना आशा असते. पण, असे होत नाही कारण, चित्रपट टॉकीजमध्ये लागतो तोच बाजारात पायरेटेड सीडी उपलब्ध होत असत. पण, आता बाजारात जाण्याची आणि पैसे खर्च करण्याचीही गरज नाही कारण, घरबसल्या इंटरनेटवर नवे चित्रपट पाहता येऊ लागले आहेत.

या भितीमुळेच निर्मात्यांनीच इंटरनेटवर चित्रपट व्यवसाय करण्यासाठी पाऊल उचलले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 'धूम 2' मधील सुरूवातीचे स्टंट दृश्य चित्रपट रिलीज होण्याच्या काहीतासानंतर इंटरनेटवर दिसत होते.

याशिवाय 'लगे रहो मुन्नाभाई' लाही 6 भागामध्ये दाखविण्यात येत होते. हे व्हिडीओ शेयर वेबसाइट्सवर उपलब्ध होतात. यासाठी थोडे जास्त सर्च करावे लागते.
संबंधित माहिती शोधा
आणखी
आता अंतराळातही इंटरनेट
दोन कंपन्याकडून कर्मचा-यांची भरती सुरूच
सावधान.. आपल्या सर्फिंगवर ब्रिटिशांची नजर
आपल्या लॅपटॉपची काळजी कशी घ्याल
अभ्यासाचे धडे आता मोबाईलवर
ओबामांच्या विजयाने आयटीयन्स चिंतेत