मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > आयटी/ माहिती व तंत्रज्ञान > आयटीच्या जगात > नवीन प्रिंटर खरेदी करण्यापूर्वी !
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
नवीन प्रिंटर खरेदी करण्यापूर्वी !
वेबदुनिया
Printer
SmitaWD
घरा-घरात, ऑफिसमध्ये साधी नजर जरी फिरवली तर कॉम्प्युटर, प्रिंटर व स्कॅनर सहज दृष्टीत पडते. याचे मुख्य कारण म्हणजे काळाचा बदलता प्रवाह. काम उरकण्याची घाई व कामाला वेळ देण्यासाठी वेळच नाही. मात्र, प्रत्येकाचे काम कसे झटपट झाले पाहिजे. पुरेशा माहिती अभावी घेतलेले काही प्रिंटर तर गेल्यात जमा झाले आहेत.

आपण नवीन लेजर प्रिंटर खरेदी करण्याच्या विचारात आहात तर खाली दिलेल्या गोष्‍टी विचारात घेणे महत्त्वाचे आहे.

लेजर प्रिंटर जरी आज आपल्याला महाग वाटत असले तरी ते दिसता क्षणी तुम्ही त्याच्याकडे आकर्षित व्हाल. इंकजेट प्रिंटर किंमतीवरून जरी परवडण्यासारखे असले तरी लेजर प्रिंटरच्या प्रिंटची क्वालिटी, स्पीड आदी त्याच्यापेक्षा किती तरी पटीने चांगली आहे.

* सगळ्यात आधी हे निश्चित करा की, तुम्हाला कुठल्या प्रकारचे डॉक्यूमेन्ट जास्त करून प्रिंट करावे लागतात. जसे की, ग्राफिक्स, टेक्स्ट किंवा वेगवेगळ्या पेपरवर प्रिंटिंग.

* तुम्हाला तुमच्या प्रिंटरमध्ये कुठकुठले फीचर्स पाहिचे, आधी त्यांची एक सूची बनवा. जशी की, मोठी फाईल प्रिंटिंग, एक जास्तीचा पेपर ट्रे आदी गोष्टी तयार केलेल्या सूचीमध्ये आलेल्या असाव्यात. तुमच्याकडे आहे त्या जागेत ते बसू शकेल का, याचा आधी विचार करणे आवश्यक आहे.

* वेगवेगळ्या प्रिंटरच्या प्रिंट क्वालिटी पाहूनच निश्चित करा की कुठल्या प्रिंटरची क्वालिटी सुबक आहे.

* तुम्हाला आवडल्या असलेल्या प्रिंटरची स्पीड बघुनच त्यांच्या क्वालिटीचा अंदाज बांधता येऊ शकतो.

* जर तुम्ही लिफाफा, लेबल आदींवर प्रिंटिंग करण्‍यासाठी प्रिंटर खरेदी करत आहात तर हे लक्षात ठेवा की, पेपर पाथ(ज्या ठिकाणाहून पेपर प्रिंटींगसाठी जातो) 90 डिग्रीपेक्षा जास्त रूंद नको.

प्रिंटरच्या लुकसोबत फीचर्सकडेही देखील लक्ष दिले पाहिजे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
आता इंटरनेटवरून फिल्म पायरसी
आता अंतराळातही इंटरनेट
दोन कंपन्याकडून कर्मचा-यांची भरती सुरूच
सावधान.. आपल्या सर्फिंगवर ब्रिटिशांची नजर
आपल्या लॅपटॉपची काळजी कशी घ्याल
अभ्यासाचे धडे आता मोबाईलवर