मोबाइल खरेदी करणं सोप्प असलं तरी आपल्या जास्तीत जास्त गरजा पूर्ण करण्यासाठी नक्की कोणता मोबाइल घ्यावा, याचा निर्णय घेणं जरा अवघडच असतं. अनेक मोबाइल पाहिल्यावर या गोंधळात आणखी भर पडते. तुमचा हाच गोंधळ दूर करण्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 'मोबाइल गाईड..!'
मोबाइल खरेदी करण्याआधी तो कोणत्या कारणासाठी हवाय, हे आधी निश्चित करा. म्हणजे खरेदी करणं सोपं होईल. एकदा सगळं ठरलं, पैसे घेतले, की मग येतो एकदम महत्त्वाचा प्रश्न. कोणत्या ब्रॅण्डचा मोबाईल हवाय. मनात एखादा ब्रॅण्ड असेल, तर त्या ब्रॅण्डची जवळची मोबाईल गॅलरी गाठा.
मोबाइल गॅलरीमध्ये तुमच्या मनातल्या मोबाइल संदर्भातील प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी स्वतंत्र व्यक्तींची नियुक्ती केलेली असते. त्यांच्या मदतीने कोणता मोबाइल आपली गरज भागविणारा आहे. विशेष म्हणजे तो आपल्या बजेटमध्ये आहे किंवा नाही याची कल्पना येते.
मोबाइल घेताना आपल्या गरजा दुकानदाराला स्पष्ट सांगा. दुकानदार दाखवत असलेल्या मॉडेलविषयी मनात आलेली प्रत्येक शंका त्याला विचारा जोपर्यंत आपल्या शंकेचं निरसण होत नाही तोपर्यंत त्यालाविचारत रहा. बॅटरीच्या लाइफविषयी विचारून घ्या. कोणत्या गोष्टीमुळे बॅटरी जास्त जाते, हे ही दुकानदाराला विचारायला कमी करू नका. जो मोबाइल आपल्याला कळत आहे, तोच मोबाइल खरेदी करण्याचा विचार करा. गर्दी- गोंधळात रिंगटोन व्यवस्थित ऐकू येत आहे किंवा नाही आधी ते तपासून पहा. कारण शेवटी निर्णय तुमचा आहे.
मोबाइलमध्ये एफएम, एमपी 3, एमपी 4, कॅमेरा आदी गोष्टी असतात. त्यात मोबाईलसाठी एक्स्टर्नल मेमरी कार्डही उपलब्द्य आहे का आणि कि ती एमबी अथवा जीबी मेमरी एक्स्टेण्ड करता येईल ते विचारा. बाजारात 128 एमबी, 256 एमबी, 1 जीबी ते 8 जीबीपर्यंतचे कार्ड उपलब्ध असतात. अधिक मेमरी कार्ड असलेल्या मोबाइल कार्डसाठी जास्त किंमत मोजाबी लागते. हे आधी लक्षात घ्या. मोबाइलसोबत मिळणारा हेड फोनही तपासून पहा. कारण दुकानातच तो व्यवस्थित नसेल तर बदलून मिळेल, घरी नेल्यावर तो दुकानदार बदलून देणार नाही. मोबाइलमध्ये गेम, गाणी, वॉलपेपर भरायचे असतील तर ते मोबाइल खरेदी करताहेत त्याच दुकानातून भरून घ्या. फाईल व्यवस्थित डाऊनलोड होताहेत किंवा नाही हे लक्षात येईल. एकदा का तुमच्याशंका दूर झाल्या की मग मोबाईलची किंमत बघा. मोबाइलच्या किंमती तडजोड करा. तसेच त्यांच्या वॉरंटी विषयी हट्ट धरा. मोबाइल घरी नेला असता त्याचा आयएमईआय नंबर माहित करून घ्या. हा 15 आकडी नंबर तुमच्या लक्षात राहिल अशा जागी लिहून ठेवा. जर मोबाईल चोरीला गेला तर कंपनीला हा नंबर कळवून मोबाईलची सगळी यंत्रणा बंद करून तो निकामी करता येतो. मग काय अनेकप्रश्न सुटले ना. आता कधी घेताय नवा मोबाईल!