डेलचा नवा नोटबुक आकाराचा कम्प्युटर आता जपान आणि अमेरिकेनंतर भारतीय बाजारात दाखल झाला आहे. डेल इन्सपायरॉन मिनी 12 नोटबुक असे या लॅपटॉपचे नाव आहे. त्याचे वजन 1.24 किलोग्रॅम आणि जाडी .92 इंच आहे. प्रवासात वेब, ब्लॉग, व्हिडीओ. चॅट आणि ई-मेल यांचा नियमित वापर करणाऱ्यांसाठी हा लॅपटॉप उपयुक्त आहे. याला 1.6 गेगाहर्टझ इंटेल एटॉम झेड530 प्रोसेसर आहे. त्यात 12.1 इंच डब्ल्यूएक्सजीए डिस्प्ले आहे. 533 मेगाहर्टझ एफएसबी आहे. यात 80 जीबीची हार्डडिस्क आहे. याशिवाय कंपनीचे बॉक्स.नेटशी टायअप आहे. त्यानुसार या लॅपटॉपचा उपयोग करणाऱ्याला दोन जीबीची अतिरिक्त जागा या वेबसाईटवर मिळू शकते. डिल रिमोट एक्सेस या सुविधेद्वारे तुम्ही या संगणकापासून दूर असलात तरी मोबाईल फोनच्या सहाय्याने यातील फाईल्स तुम्ही एक्सेस करू शकता. त्या इतरत्र पाठवू शकता. याची बॅटरी लाईफही जास्त आहे. |