खबरबात | आमने-सामने | कुजबूज | न्यूजमेकर्स | पोलखोल
मुख्य पृष्ठ वृत्त-जगत » कौल महाराष्ट्राचा » खबरबात » मनसे निवडक १२५ जागा लढणार
खबरबात
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीत लोकसभेचाच फॉर्म्युला वापरणार असून निवडक १२५ जागांवरच निवडणूक लढविणार असल्याचे कळते.

लोकसभा निवडणुकीत मनसेने ११ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी एकाही जागेवर विजय मिळाला नसला तरीही पक्षाच्या सर्व उमेदवारांनी प्रत्येक ठिकाणी एक लाखाहून अधिक मते मिळाली आहेत. एकूण नऊ विधानसभा मतदारसंघात मनसे प्रथम क्रमांकावरच आहे तर १३ ठिकाणी दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली आहेत.

निवडक ठिकाणी लढण्यामागे निवडणूक लढण्याची शक्यता जिथे आहे तिथेच जोर लावणे व अनावश्यक ताकद, पैसा व वेळ खर्ची न घालणे हा हेतू असल्याचे समजते. प्रामुख्याने मुंबई, ठाणे, कोकण, खानदेश, पुणे व औरंगाबाद तसेच मराठवाड्याच्या काही भागात मनसे आपले उमेदवार उभे करेल असे दिसते.

शिरीष पारकर, प्रवीण दरेकर, नितिन सरदेसाई यांच्यासह अनेकांची नावे उमेदवार म्हणून निश्चित झाल्याचे कळते.